Pages

Friday, March 23, 2018

Bhagat Singh became a martyr at just 23/wiki /Quotes /jivanparichay/deshbhakt/memorable thoughts/inspirational thoughts

Bhagat Singh became a martyr at just 23/wiki /Quotes /jivanparichay/deshbhakt/memorable thoughts/inspirational thoughts




शाहिद भागत सिंग जन्म दिनांक         २७ डिसेम्बर १९०७
जन्म स्थान                                     पंजाब
आई                                               विद्यावती
वडील                                             सरदार किशन सिंग सिंधू
मृत्यू                                             २३ मार्च १९३१  लाहोर

भागत सिंग यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे  वडील तुरुंगात होते .लहानपणापासूनच त्यांनी घरातच देश भक्ती चे धडे घेतले होते .१९१९ ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने ते खूप दु:खी झाले होते आणि त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला .
भागत सिंग लाहोरच्या नॅशनल कॉलेजला बी ए  करत होते तेव्हा त्यांची भेट सुखदेव आणि भगवती चरण यांच्या सोबत झाली .देशप्रेमामुळे त्यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला असता त्यांनी लग्नाला नकार दिला .   
भागत सिंग यांनी प्रथम नौजवान भारत सभेत सहभाग घेतला .त्यांच्या घरच्यांनी लग्नाचा विचार करणार नाही असे सांगितले तेव्हा ते आपल्या घरी परतले .१९२६ मध्ये नौजवान सभेत त्यांना सेक्रेटरी बनवण्यात आले .१९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभाग घेतला जी चंद्रशेखर आझाद यांची पार्टी होती.सायमन कमिशन विरोधात झालेल्या मोर्च्यात लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला .
भागत सिंग आणि त्यांच्या पार्टीने लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले त्यांनी ओफिसर स्कॉट याला मारण्याचा डाव रचला .
डिसेंबर १९२९ भगत सिंग यांनी दोस्त बटुकेश्वर दत्त यांनी मिळून ब्रिटिश एस्सेमली मध्ये बॉम स्फोट घडून आणला .त्यांना अटक करण्यात आली आणि खटला भरण्यात आला .
२३ मार्च १९३१ भागत सिंग ,सुखदेव ,राजगुरू याना फाशी देण्यात आली २४ मार्च या ठरलेल्या तारखेच्या एक दिवस अगोदर कारण त्यांची फाशी जन्म ठेपेत बदलण्यासाठी प्रयत्न चालू होते ब्रिटिश सरकार त्यांना इतकी घाबरत होती कि एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली .
वंदे मातरम ...........   

Thursday, March 22, 2018

Marathi grammer/wiki/mpsc/talathi/lipik



Marathi grammer/wiki/mpsc/talathi/lipik

Monday, March 5, 2018

Mangesh Padgaonkar/wiki/poem

Mangesh Padgaonkar/wiki/poem

Icc director/wiki/indra nui/pepsico/income

Icc director/wiki/indra nui/pepsico/income

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) संचालकपदी नियुक्ती झालेल्या इंद्रा नूयी यांचं हे शब्दचित्र...

मोठेपणी कोण होणार असा प्रश्न मुलांना कोणी ना कोणी विचारतोच. मुलंही मग अमुकतमुक होणार असल्याची उत्तरं देतात. लहानग्या इंद्राला जेव्हा तिच्या आईनं हा प्रश्न विचारला, तेव्हा तिचं उत्तर अशाच धाटणीचं; पण तरीही वेगळं होतं. 'खूप मोठ्ठं होणार,' असं ती म्हणाली होती. प्रत्युत्तरादाखल आईनं तिला कानमंत्रच दिला. ती म्हणाली होती, 'जे कोणतं स्वप्न पाहशील, त्याचा पाठलाग कर. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस.' आईचा हा सल्ला तिनं पाळला आणि ती स्वप्नांचा पाठलाग करीत सुटली. त्यामुळे तिची स्वप्नं साकारत गेली.

या गोष्टीतील इंद्रा म्हणजे इंद्रा नूयी. 'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ. जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिलांपैकी एक. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्या सध्या बातम्यांत आहेत. महिला क्रिकेटची आता चर्चा होऊ लागली असली, तरी क्रिकेट हा प्रामुख्याने पुरुषांचाच खेळ. त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्थेवर इंद्रा नूयी यांची झालेली निवड, त्यांची कर्तबगारी अधोरेखित करणारीच आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या, नेतृत्वगुणाच्या, धडाडीच्या जोरावर एका बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिखर स्थानावर पोहोचलेल्या इंद्राच्या शिरपेचात यामुळे आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

चेन्नईतील एका मध्यम वर्गीय कुटुंबात इंद्रा २५ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्मलेल्या इंद्रांचे वडील बँकेत; तर आई गृहिणी. घरची परिस्थिती सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे. इंद्रा आणि त्यांची बहीण चंद्रिका या दोघींना त्यांची आई एकच प्रश्न अनेकदा विचारत, तो म्हणजे- 'तुम्ही मोठेपणी कोण होणार?' दोघींपैकी जिचं उत्तर आवडे तिला त्या बक्षीस देत. 'तुमचं लग्न अठराव्याच वर्षीच करणार आहे; परंतु तुम्ही तुमचं स्वप्न बघणं सोडू नका. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. मात्र, त्यासाठी प्रामाणिकपणा आणि कष्टाची गरज आहे,' असंही त्या म्हणत. आईच्या या विधानांचा आपल्यावर परिणाम झाल्याचं इंद्रा सांगतात.


इंद्रा यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पदवी मिळविली. त्यानंतर कोलकात्यातील 'आयआयएम'मधून व्यवस्थापनशास्त्राचे धडे घेतल्यानंतर काही कंपन्यांत काम केले. करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर आपल्या प्रतिभेची चुणूक दिसायला हवी, याची जाणीव त्यांना या काळात झाली. बिझनेसमधील बारीकसारीक गोष्टी शिकण्यासाठी अमेरिकेतील 'येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट'मधून 'मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट'ची पदवी घेण्याचे ठरविले. पगारातून साठलेल्या पैशातून अमेरिकेला जायचे ठरविले. उत्तम गुण मिळाल्यामुळे त्यांना येल विद्यापीठात प्रवेश मिळाला. मात्र, शुल्कासाठी पैसे नसल्याने त्यांनी दिवसा अर्धवेळ अभ्यास केला आणि रात्रीपाळीत रिसेप्शनिस्टचंही काम केलं. तेव्हापासून खरंतर त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. अमेरिकेतील अभ्यास पूर्ण केल्यावर नूयी यांनी बोस्टन कन्सल्टन्सी येथे कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु १९८६ मध्ये झालेल्या एका कार अपघातामुळे त्यांना या नोकरीला राम राम ठोकावा लागला. आणि त्यांनी कॉपोर्रेट स्ट्रॅटेजीमध्ये करिअर करायचं ठरविलं. त्यानंतर मोटोरोला, एबीबी यासारख्या कंपन्यात त्यांनी काही काळ काम केलं. १९९४मध्ये त्यांना पेप्सिकोची ऑफर मिळाली. तिथून त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं.

पेप्सिकोमध्ये त्यांच्यातील नेतृत्वगुणांना अधिक वाव मिळाला. पेप्सिकोच्या विस्कळित कारभाराची घडी सावरण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. स्पर्धक असलेल्या कोका-कोला कंपनीचे वर्चस्व मोडीत काढण्यातही त्यांची मदत झाली. त्यांच्यातील धडाडी पाहून २००६ मध्ये पेप्सिकोचे चेअरमन व सीईओ रेनमुंड यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नूयी यांना आपला उत्तराधिकारी करण्याची घोषणा केली. इंद्रा ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. आज इंद्रा यांचं वार्षिक वेतन तीन लाख डॉलर (१९३ कोटी रुपये) एवढं आहे. त्यांच्यावर पेप्सिकोच्या फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी असून, या विभागात २२ ब्रँड्सचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात सामील होणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. इंद्रा यांच्या कर्तबगारीची दखल घेऊन केंद्र सरकारने २००७ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले आहे.

अमेरिकेत स्थायिक असल्या, तरी भारतीय संस्कृतीचं त्यांना विस्मरण झालेलं नाही. आज यशोशिखरावर असतानाही त्यांना आपल्या क्षमतांची आणि मर्यादांची जाणीव आहे. 'सर्वच गोष्टी आपल्याला एकाच वेळी साध्य होत नाही, मी करिअरमध्ये जरी यशस्वी झाले असले तरी माझ्या संसारात मी फारसं लक्ष नाही घालू शकले नाही. माझ्या मुलींसाठी मी किती योग्यतेची आई आहे, हे मला माहीत नाही. कारण ऑफिससच्या कामामुळे मी त्यांना फारसा वेळही देऊ शकले नाही,' असं त्या प्रांजळपणे सांगतात

Sunday, March 4, 2018

women's day/wiki/women empowerment/issue/overview

women's day/wiki/women empowerment/issue/overview

जागतिक महिला दिन विशेष


‘तिच्या’ वाटय़ाला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहेत याची गिनती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर (की हत्या?) मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते.
या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती असते. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या 
गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणिजीवन टिपणार्‍या टी.व्ही. वाहिनवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे!
 >
तिचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पुरूषी मानसिकता. साबण, चारचाकी किंवा कोणतेही उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीतले तिचे प्रदर्शन असो, मोबाईलवरून मोबाईलकडे फिरणार्‍या ओंगळवाण्या, गलिच्छ चित्रफिती असोत, त्यातून तो पुरूषी अहंगंडच दिसून येतो. तो भाषेमध्येही कसा उतरला आहे, याचे उदाहरण नुकतेच ऐकावास मिळाले. गोटय़ांच्या खेळात जी गोटी हरते व मार खाते तिला कन्नड भाषेत ‘हेण्णु’ (मुलगी) व जिंकलेला आणि मारणार्‍या गोटीला ‘गंडु’ (मुलगा) म्हणतात.> अशा अनेक शत्रूंना रिचवत, पचवत ‘ती’ तिची लढाई लढत आहे. ती समाजाच्या नीतीमत्तेचा कणा आहे. बेहिशोबी संपत्ती गोळा करणार्‍या नवर्‍याचा हात तिने थांबवला वा मुलींशी बेताल वर्तन करणार्‍या आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली तर चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. निसर्गाने तिला ‘प्रेम’ नावाची विलक्षण देणगी दिली आहे. ते तिचे शस्त्र आहे. या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे.

तिच्या डोळतल अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती लागतील, हे सांगता येत 

Wednesday, February 28, 2018

swami vivekanda/thoughts/wiki/guideline/life

swami vivekanda/thoughts/wiki/guideline/life


1: “Take risks in your life, If you win, you can lead! If you loose, you can guide!


2: “Strength is life; weakness is death.”

3: “Experience is the only teacher we have. we may talk and reason all our lives, but we shall not understand a word of truth.”

4: “If you think yourselves strong, strong you will be.”


5: “Take up one idea, make that one idea your life. Think of it, dream of it, Live on that idea let the brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea, and just leave every other idea alone. This is the way to success.”


6: “Stand up, be bold, and take the blame on your own shoulders. Do not go about throwing mud at other; for all the faults you suffer from, you are the sole and only cause.”


7: “Meditation can turn fools in to sages but unfortunately fools never meditate.”


8: “Learn everything that is good from others, but bring it in, and in your own way adsorb it; do not become others.”


9: “In a conflict between the heart and the brain, follow your heart.”

10: “That man has reached immortality who is disturbed by nothing material.