women's day/wiki/women empowerment/issue/overview
जागतिक महिला दिन विशेष
‘तिच्या’ वाटय़ाला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहेत याची गिनती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर (की हत्या?) मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते.
या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती असते. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या
गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणिजीवन टिपणार्या टी.व्ही. वाहिनवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे! >
तिचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पुरूषी मानसिकता. साबण, चारचाकी किंवा कोणतेही उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीतले तिचे प्रदर्शन असो, मोबाईलवरून मोबाईलकडे फिरणार्या ओंगळवाण्या, गलिच्छ चित्रफिती असोत, त्यातून तो पुरूषी अहंगंडच दिसून येतो. तो भाषेमध्येही कसा उतरला आहे, याचे उदाहरण नुकतेच ऐकावास मिळाले. गोटय़ांच्या खेळात जी गोटी हरते व मार खाते तिला कन्नड भाषेत ‘हेण्णु’ (मुलगी) व जिंकलेला आणि मारणार्या गोटीला ‘गंडु’ (मुलगा) म्हणतात.> अशा अनेक शत्रूंना रिचवत, पचवत ‘ती’ तिची लढाई लढत आहे. ती समाजाच्या नीतीमत्तेचा कणा आहे. बेहिशोबी संपत्ती गोळा करणार्या नवर्याचा हात तिने थांबवला वा मुलींशी बेताल वर्तन करणार्या आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली तर चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. निसर्गाने तिला ‘प्रेम’ नावाची विलक्षण देणगी दिली आहे. ते तिचे शस्त्र आहे. या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे.
गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणिजीवन टिपणार्या टी.व्ही. वाहिनवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे! >
तिच्या डोळतल अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येत
No comments:
Post a Comment